१० ते ५० हजारापर्यंत ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध
प्रधानमंत्री पथविकेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात सुरू असुन यामध्ये फेरीवाल्यांसाठी १० ते ५० हजार रूपयापर्यंत कर्ज उलपब्ध करून देण्यात येत आहे.
यामध्ये पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्यात १० हजार रूपये कर्ज उलपब्ध करून देण्यात येते सदर कर्ज परतफेडीनंतर दिड वर्ष कालावधीसाठी वीस हजार आणि त्यांनतर तीन वर्ष कालावधीसाठी ५० हजार रू विणातारण कर्ज देण्यात येत आहे. यासाठी फक्त ७ टक्के व्याजदर आकारला जात आहे.
यासाठी www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थावरून किंवा ऑनलाईन सेंटरवरून अर्ज करता येईल. सदर कर्ज प्रकरण भरण्याकरिता आधारकार्ड, बँक पासबुक व आधारलिंक मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ चिमुर शहरातील रस्त्यावरील फेरीवाले तसेच आजुबाजुच्या गावातील परंतु चिमुर शहरात व्यवसाय करणारे नागरीक घेऊ शकतात.
सदर प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेचा चिमुर शहरातील जास्तीत जास्त पथ वीक्रेत्यांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी चिमुर नगर परिषदेसोबत संपर्क साधावा असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रीया राठोड यांनी केले आहे.
पोलीस संरक्षणात पार पडली ग्रामसभा
कोलारा ग्रामपंचायत येथील प्रकार -
अवैध जिप्सी ठराव तो वादग्रस्त ठराव नाममंजुर करण्यासाठी ग्रामस्तनांनी ग्रामपंचायतीला कुलुप लावले. व तीसऱ्या दिवसी तोडगा न निघल्यांने पोलीस संरक्षणात कुलुप तोडले व ग्रामसेवकांनी २७ ऑक्टोबर शुक्रवारला विशेष ग्रामसभा ग्राम पंचायत आवारात पार पडली. त्या ग्रामसभेत अखेर तो वादग्रस्त ठराव नाममंजुर करन्यात आला.
कोलारा ग्रामपंचायतीत गावकर्यांनी ग्राम सभेचे आयोजन १४ ऑक्टोबरला केले होते या ग्रामसभेत सरपंच सदस्य आले नव्हते त्यामुळे गावकर्यांनी रात्रो १० वाजता ग्रामपंचायत ला कुलुप लावले. दरम्यान ग्रामसेवकांनी तीन दिवसांनी पोलीस संरक्षणात कुलुप तोडले. व ग्रामसेवकाने ग्रामसभेची नोटीस काढून शुक्रवार ला त्या जिप्सीच्या वादग्रस्त ठरावाविषयी ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेला गावातील महिला, पुरुष उपस्थित होते. ग्रामभेला दोन विषय ठेवण्यात आले होते. कोलारा येथील डिजीटल गेट बाजुला नेण्यात यावा. परंतु वन विभागाने त्यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना गेटच्या बाजुला रस्ता काढून देण्याचे आवश्वान दिले. त्यामुळे तो विषय एकमतांनी मंजुर करण्यात आला. परंतु चार जिप्सी गेटवर लावण्याचा वादग्रस्त विषय घेताच गावकऱ्यांत संतापून ग्रामस्तांच्या एकमतांनी तो वादग्रस्त ठराव नामंजूर करण्यात आला. या गेट वर जिप्सी घेतांना विशेष ग्रामसभेचे आयोजन करूनच व ईश्वरचिठ्ठीनेच पुर्वीच्या पद्धतीनेच निवड करण्यात यावा. असाही ठराव मंजुर करण्यात आला. ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामसभेच्या दिवशी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. व गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीसांचे दंगा पथक, पोलीसांची कुमक गावात तैनात करण्यात आली होती.
शेतात पाणी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा सर्प दंशाने मृत्यु
- अखेर वहाणगांव वासीयांच्या आंदोलणाला यश
शेतीत पाणि करण्यासाठी गेलेल्या शेतकरी युवकांचा सोमवारच्या रात्री सर्प दंशाने मृत्यु झाला. मृतक शेतकर्यांचे नाव नितीन रामचंद्र जुमनाके असुन वहानगांव येथील रहिवासी आहे. दरम्यान मृतकाचा परिवार व गावकऱ्यांनी शेतात बारा तास विज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मंगळवार ला ठिय्या आंदोलन केले होते.
दिवसा सिंगल फेज रात्री नाहीच्या बरोबर लाईट कधी लाईट आली तर येते नाही तर रात्रभर लाईट बंद असते. शेताला पाणि करण्याच्या दृष्टीकोनातून सोमवार ला आपल्या गावा सेजारील शेतात नितीन पाणि करायला गेला होता. त्यातच शेतात सर्प दंशाने त्याचा मृत्यु झाला मृतक माझी सरपंच कलाबाई जुमनाके यांचा मुलगा आहे. हल्ली या विज वितरण कंपणीच्या जाचाला शेतकरी कंटाळले असुन शेतकऱ्यांत विज वितरण कंपनी विषयी रोष निर्माण झाला आहे. गावात दसरा, दुर्गा उत्सव असताना नितीनच्या मृत्युने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान गावकरी व मृतकाच्या परिवाराने शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे याच्या नेतृत्वात चिमूर येथील एमएसईबी कार्यालयातील अधिकार्याला जाब विचारन्याच्या दृष्टीकोनातुन मृतकाचे प्रेत एमएसईबी कार्यालयात नेवून ठिय्या देण्याचे ठरवीले होते मात्र पोलीसानी या आंदोलनाला नकार दिला होता त्यामुळे उप जिल्हा रुग्णालय येथेच ठिय्या आंदोलन सुरु केले होते. नंतर चिमूरचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी मध्यस्ती करत एमएसईबी अधिकार्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे बोलवून बारा तास शेतात विज विषयी शेतकर्यांच्या मागणीचा तोडगा काढला.
अखेर आंदोलनाला यश आले. दिवसाला बारा तास विज पुरवठा करन्याची मागणी मंजूर झाल्यामुळे ठिय्या आंदोलन मागे घेन्यात आले. आंदोलणात अमर रहे , अमर रहे नितीन जूमनाके अमर रहे. जय जवान जय किसान अशा घोषणा शेतकरी बांधवानी दिल्या होत्या .
चिमूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थिनी भूमिका अभिनयात नागपूर विभागात प्रथम
नागपूर विभागात सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून चिमूर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा येथील विद्यार्थीनींनी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023-24 या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागीय स्तरावर इंटरनेटचा सुरक्षित वापर व साक्षरता मीडिया या विषयावर उत्कृष्ट भूमिका अभिनय सादर करुन नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला असल्यामूळे त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.
सदर विभागीय स्पर्धा हि गुरुवारला राज्य विज्ञान शिक्षण संस्था, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवीनगर, नागपूर येथे पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. हर्षलता बुराडे, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजकुमार अवसरे, डॉ. गंगाधर वाळले, बुरघाटे, अधिव्याख्याता विभागप्रमुख डॉ. अपर्णा शंखदरबार, परीक्षक सीमा गोडबोले व सूचना भावसार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शमिका अभिनय सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकविनाऱ्या चिमूर येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देन्यात आले.
तालुक्यात ही शाळा विविध उपक्रम राबवित असुन नानाविध स्पर्धामध्ये सहभागी होत असते. नागपूर विभागातील एकुण सहा जिल्ह्यातील विद्यार्थी भूमिका अभिनय सादरीकरनासाठी सहभागी झाले होते. त्यापैकी चिमूर येथील निवासी शाळेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला. या भूमिका अभिनय स्पर्धेत सहभागी विद्यार्थीनी विभा गव्हारे. क्षिप्रा खोब्रागडे, आकांक्षा रामटेके,समृद्धी नागदेवते, खुशबू रामटेके यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि मार्गदर्शिका सुनिता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात व सहायक शिक्षक विनय खापर्डे यांच्या उपस्थित सादरीकरण करण्यात आले होते. नागपूर विभागात मोठी भरारी मारुन राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्यामुळे सहायक आयुक्त समाज कल्यान चंद्रपूर बाबासाहेब देशमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य हिवारे , जि प माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटशिक्षणाधिकारी कांबळे, पंचायत समितीचे केंद्रप्रमुख महल्ले, सर्व पदाधिकारी आणि साधन व्यक्ती यांनी यांनी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व सहभागी विदयार्थीनींचे अभिनंदन केले.सदर स्पर्धेसाठी शाळेतील सर्व सहकारी वृंद सतीश कुकडे मनोहर गभने, अनुराधा महाजन , हेमुताई मगरे, धात्रक, आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती.
कोन कुठला काही पत्ता नाही कोनाला कवडीचा त्रास नसलेला बेवारस राजू चिमूरात कसा आला कळलेच नाही. पाहता पाहता पंचेविस वर्ष झाली कोनीच त्यांच्या आरोग्याची व पुर्नवसनाची दखल घेतली नाही. मिळेल ते खाने आणि आपल्या रोजच्या ठिकाणी राहने एवढेच होते. अशातच चिमूर क्रांतीभूमीचे सुपूत्र शुभम पसारकर यांच्या नजरेस राजू दिसला. त्यांच्यासोबत मैत्री करत वार्तालाप केला. तो हिंदी व्यतीरिक्त इतर भाषा बोलत असताना आढळला क्षणातच चांगला तर क्षणातच वाईट बोलत होता. बोलन्यावरून राजू मनोरुग्ण असल्याचा भास होत असताना त्याला सक्त उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच दिव्यवंदना आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष शुभम ने बेवारस राजू ला नागपूर येथील पूर्नवसन केंद्रात दाखल केले.
राजू जेव्हा चिमूर शहरात आला तेव्हापासून इंदिरा नगर वस्तीला लागुन असलेल्या बालाजी मंदीर देवस्थानच्या मालकीच्या तलावात सकाळीच आंघोळ करून नेहमीच्या ठिकाणी राहत होता. कोनी ही सांगीतले ते काम करित असताना मात्र राजू चा कोनाला काही त्रास झाला नाही. राजू चे ज्या व्यक्ती सोबत जमले त्या व्यक्ती ला भैया किंवा भाभी म्हणत होता. दोन वर्षपूर्वी कोरोणाचा काळ भयावह असताना त्या काळात घरातील अनेक मानसं मृत्युमुखी पडली समाजातील अनेक संसार उद्धवस्त झाले अशी मन सुन्न करनारी परिस्थिती असताना त्याही कोराणाच्या काळात राजू कर्दनकाळ ठरला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती कोरोणाचा काळ सर करत रात्री हायवे रस्त्यालगत दुकान चाळीत निवांत झोपायचा. दिसायला ठणठणीत असलेल्या राजू ला नितांत उपचाराची गरज आहे हे समाजाला कळले नाही. राजू पहायला थोडा भयानक पन बोलायला शांत स्वभावाचा होता. परिस्थिती सापेक्ष शुभम ने पंधरा दिवस चालता बोलता राजू सोबत मैत्री केली.
या देशात अनेक जाती धर्माची पंताची लोक राहतात मानूस हा समाजशील असला तरी सर्वच दान - पून करनारी नसतात स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण थोड दुसऱ्यांसाठी जगून पहायचं अस मनाशी ठरवून स्वतः ला सामाजिक कार्यात झोकून देत स्वतच्या मताशी ठाम व विचाराशी कधीही तडजोड न करणारे, बेघर ,बेवारस, भिक्षेकरी, निराधार ,अनाथांची सेवा व सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले व्यक्तीमत्व चिमूर येथील दिव्यवंदना फाऊंडेशन चे शुभम पसारकर यांनी जे केल ते इतरांना जमलं नाही. अखेर पंचेविस वर्षानंतर राजू ची शहरातील परिस्थिती लक्षात घेता चिमूर पोलीस स्टेशन व दिव्यवंदना आधार फाऊंडेशन च्या वतीने केंद्र शासन भिक्षेकरी पुनर्वसन केंद्र नागपूर महानगर पालिका येथे राजु ला पुनर्वसनाकरिता दाखल करण्यात आले आहे. येत्या काही दिवसामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे राजू ला उपचाराकरिता भरती करन्यात येईल. राजू उपचारातून बरा झाल्यानंतर दिव्यवंदना फाउंडेशन राजूची संपूर्ण जिम्मेदारी घेत आधार देनार आहे.
,...................................................................
गरजू लोकांकरिता मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून रस्त्यावर राहनाऱ्या लोकांना तातडीने मदत, पूर्नवसन करन्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या परिसरात रस्त्यावर भिक्षेकरी बेवारस बेघर गरजू व्यक्ती आढळल्यास चिमूर येथील दिव्यवंदना आधार फाऊंडेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन शुभम पसारकर यांनी केले आहे.
बार्टि तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वकिली शताब्दीवर्ष -
.......................................
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून फिरत्या न्यायालयाची मागनी केली होती त्यावेळेस जर हे विधेयक मंजूर झाले असते तर आज घडीला तिन कोटी केसेस प्रलंबीत नसत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीत सर्वव्यापकता, मानवतावादी, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमची तत्परता असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दुरदृष्टीचे निष्नात वकील होते. दिवानी व फौजदारी न्यायालय चिमूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली शताब्दी वर्ष कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता संघ चिमुर चे अध्यक्ष आर.आर.सोनडवले, प्रमुख अतिथी अधिवक्ता संघाचे सचिव अगडे, अधिवक्ता महेशदत्त काळे, अधिवक्ता लांबट, अधिवक्ता शिवरकर ,अधिवक्ता थुटे, अधिवक्ता श्रीरामे,अधिवक्ता हिंगे,अधिवक्ता आर जी रामटेके, अधिवक्ता एन यू रामटेके, अधिवक्ता सूभाष नन्नावरे, अधीवक्ता संजीवनी सातारडे, अधिवक्ता नितीन रामटेके आदी उपस्थित होते दरम्यान समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी सविधान रत्न अधिवक्ता नितीन रामटेके यांचा सत्कार करत सर्व अधिवक्ता यांना बार्टीच्या वतीने संविधान प्रत देन्यात आली.
पुढे बोलताना समतादूत राजूरवाडे म्हणाल्या की, समाजसुधारक र.धो कर्वे हे महीलाचे स्वास्थ व लैंगिक शिक्षणावर कार्य करित असताना समाज स्वास्थ ह्या नियतकालिके वर खटला भरवन्यात आला होता. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे वकीलीपत्र घेतले होते. न्यायलयानी बाबासाहेब यांना विचारले होते हे विकृत आहे का बाबासाहेब यांनी उत्तर देताना म्हंटले की समाजात काहि लोकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषय आवडत नाही म्हणून कर्वे नी लिहायचेच नाही का? आज इतक्या वर्षांनी जेव्हा लैंगिक हिंसाचार समाजात होतात. तेव्हा कर्वे चा डॉ बाबासाहेबांनी चालवलेला खटला आज ही किती म्हत्वाचा वाटतो. डॉ बाबासाहेब यांचे जेधे मोरे बद्द्ल राजकिय वैमनष्य होते तरी त्यांचे ही वकिलीपत्र घेतले म्हणून वकिलांनी न्याय मिळवून देताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला समोर ठेवुन न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करावे न्यायाची दये सोबत गफलत करु नये समाज हा न्यायामुळे सक्षम स्वयंपूर्ण होतो. तळागाळातील वंचित घटकाना न्याय मिळवून दिला पाहीजे असल्याचे बोलत होत्या. कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता डी के नागदेवते आभार अधिवक्ता जे डी मुन यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य वकील होते.
मुंबई येथील मराठा लाईफ फाउंडेशन ने जिम्मेदारी घेत दिला आधार
एक मनोरुग्ण महिला अनेक दिवसापासून एका गावात इकडे तिकडे भटकत होती त्या महिलेचा गावकऱ्यांना त्रास होत असल्याची माहिती समोर आली. त्या महिलेचे नाव वैशाली मदन सोनटक्के असून ती 29 वर्षाची आहे सदर महिला ही मनोरुग्ण असून मासाळ या गावांमध्ये पंधरा दिवसापासून राहत आहे. यांची माहीती चिमूर येथील दिव्यवंदना आधार फाऊंडेशन ला मिळताच त्या महिले विषयी संपूर्ण माहिती गावकऱ्यांकडून जानुण घेत मनोरुग्ण महिला वैशालीला मदत केली.
- " वैशाली " मूळची भिवापूर तालुक्यातील नांद येथील रहीवासी आहे. तिचे आई - वडील ६ वर्षापूर्वीच स्वर्गवासी झाले. तिला कोनाचाहि आधार नाही. रहायला घर नाही. जे नागरीक देईल ते खाने आणि राहणे एवढीच भूमीका वैशालीची असल्याची माहिती दिव्यवंदना फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मिळाली. त्यांनी मासाळ येथील ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील व गावकरी,यांच्याशी संपर्क साधून मनोरुग्ण महिला विषयी चर्चा केली. वैशालीच्या चेहर्यावरील नैराश्य पाहून आपल्याच मनाला वेदना होत होत्या तात्काळ महिलेची दखल घेत कायमस्वरूपी आधार देण्याचा व तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी शुभम ने प्रयत्न सुरू केले. यासाठी मासळ (बु) येथील नागरिकांनी लोकसहभागातून मदत केली.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मराठा लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष किसन लोखंडे यांच्याशी दिव्यवंदना आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी संपर्क साधत मनोरुग्ण महिलेबद्दल माहिती दिली वैशालीला मुंबई येथील मराठा फाऊंडेशन येथे भरती केले असता त्या मनोरुग्ण वैशालीची काळजी घेत तीच्या आखरी श्वासापर्यंत आधार देत निवास, उपचारांची सोय करेल अशी ग्वाही दिली. मुंबई येथील मराठा लाईफ फाउंडेशन येथे वैशालीला भरती होताच तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आनंद पाहून गावकऱ्यांनी दिव्यवंदना आधार फाउंडेशन व मराठा लाइफ फाउंडेशन यांचे आभार मानले. यावेळी दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, दिव्या गलगले, नथ्थु मेश्राम , रेखा मेश्राम, वामन बागडे, अब्दुल रफिक शेख आदी उपस्थित होते.
शिक्षकदिनी शिक्षकांनी केला निषेध
सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षकदिनी शिक्षक शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करण्यात आले.
५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन.हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो.या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो.पण अशैक्षणिक कामाच्या ओझ्यात शिक्षक भरडला जात आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांची मागणी आहे.अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामांमुळे शिक्षक बेजार झाला आहे.अशैक्षणिक कामांचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या अशैक्षणिक कामाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला अशी माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, कार्याध्यक्ष जब्बार शेख, सचिव नंदकिशोर शेरकी,राजाराम घोडके,निर्मला सोनवणे,विलास फलके, विरेनकुमार खोब्रागडे,रावण शेरकुरे, कैलाश बोरकर,शेषराव येरमे, क्रिष्णा बावणे, राजेश धोंगडे,संजय बोबाटे यांनी दिली आहे.
- सिंधूताई सपकाळ व वंचळाबाई लोखंडे स्मृतीप्रित्यर्थ
मराठा लाईफ फाउंडेशन व जीवन ज्योत ड्रग्ज बँक, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, नशामुक्ती केंद्र सिंधूताई सपकाळ व वंचळाबाई लोखंडे यांच्या स्मृृतीप्रित्ययर्थ मराठा लाईफ फाउंडेशन चे संस्थापक किसन लोखंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत जांभूळपाडा, भालीवली, मुंबई येथे ३० ऑगस्ट २०२३ बुधवारला चिमूर क्रांती भूमीतील अनाथांचा नाथ दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मानव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चिमूर क्रांती भूमितील रहीवासी शुभम पसारकर असे व्यक्ती महत्व आहे की ज्यांची परिस्थिती हलाकीची असताना सुद्धा सामाजीक संघर्षातून मार्ग शोधत अनाथाच्या नाथान अल्पावधीतच नाव लौकीक करत विश्व निर्माण केल. शुभम ला बालपणापासूनच भुकेल्यांना अन्न व गरजूंना मदत करने आवडत होते. शुभमचे शिक्षण कळत न कळत जेमतेम पदवी पर्यंत झाले असले तरी मात्र काही कारणास्तव वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडून एका हॉटेलात नौकरी केली. हॉटेलात नौकरी करत असतांना अस लक्षात आल की असे खूप लोक रस्त्यावर उपाशी आहेत जे लोक या हॉटेलमध्ये काही वाया गेलेलं अन्न मागायला येतात ते पण त्यांना दिल जात नाही अशा लोकांची अशी बिकट वाईट परिस्थिती पाहून शुभमच्या मनाला ठेच लागली तेव्हाच निश्चय करत शुभमने वर्तमान स्थितीत गरजू लोकांसाठी काम करण्याचा निश्चय केला. काळ परतवे काही वर्ष त्यांनी नागपूर मध्ये पाच वर्ष सेवा देत 2022 मध्ये दिव्यवंदना आधार फाऊंडेशनची स्थापना केली. शुभमने स्वता अतोनात कष्ट करत व लोकांनी दिलेली स्व मदत, लोकवर्गनी, सेवाभावी दानातून रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, लोकांच्या स्वप्नातील घर ( निवारा ) बांधकामाला हल्ली चिमूर क्रांती भूमी व भिसी अप्पर तहसील साज्यातील जांमगाव (कोमटी ) येथे सुरुवात केली आहे.
शुभम ने कोरोणा काळात ज्यांच कोणी नाही अशा लोकांना मदत करत आश्रय देत काहींचा उपाचार केला उपचारातुन बरे झालेल्यांना त्यांच्या घर पर्यत पोहचविण्याच काम केल त्याच कामाची पावती व सहकारी नागरीकांच्या सहकार्याने शुभम ला मानव सेवा पुरस्कार मिळाला. मानवसेवा पुरस्कार मिळ्याबदल शुभमच्या चाहत्यांनी व चिमूर क्रांती भूमी परिसरातील नागरीकांनी कौतुक केले आहे दरम्यान मराठा लाईफ फाऊंडेशन ने ५१ हजार रुपयांचा धनादेश दिव्यवंदना आधार फाऊंडेशनला बांधकामासाठी मदत म्हणून दिला आहे. चंद्रपूर जिल्यातील चिमूर तालुक्यातील जांमगाव (को) येथे भिक्षेकर्यांसाठी हे पहिलं केंद्र असून आपनही बांधकामासाठी आर्थिक मदत देत दिव्यवंदना आधार फाऊंडेशन बळकट करा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी केले आहे.